आणि म्हणून त्यानं नोकरीच्या शेवटच्या दिवशी त्याने हे केले | पाहा हा वीडियो | Donald Trump Latest

2021-09-13 0

नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट ट्विटरकडून डिअॅक्टिव्हेट करण्यात आले होते. त्यानंतर अमेरिकेसारख्या महासत्तेचे नेतृत्त्व करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचं हँडल बंद करण्याचे धाडस कोणी केले याची चर्चा प्रसारमाध्यमात चांगलीच रंगली होती. ट्विटरनं माफी मागून ट्रम्प यांचे ट्विटर हँडल पुन्हा अॅक्टीव्हेट केले होते. १ महिन्यानंतर पहिल्यांदाच ती व्यक्ती जगासमोर आली आहे.त्याचं नाव बहतीयार ड्युसक असून तो जर्मन नागरिक आहे. ट्विटरच्या ट्रस्ट अँड सेफ्टी विभागात तो काम करायचा.  तो  अमेरिकेत वर्क अँड स्टडी व्हिसावर आला होता. ट्विटरवर येणाऱ्या आक्षेपार्ह कॉमेंट, अनधिकृत ट्विट, गैरवर्तन करणारे अकाऊंट ज्यांच्याबद्दल ट्विटरकडे तक्रार करण्यात आली आहेत त्या तक्रारींची नोंद घेऊन त्या डिलीट करणं हे बहतीयारचं काम होतं. त्यादिवशी तो नेहमीप्रमाणे काम करत होता. त्यावेळी अनेकजणांनी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट आक्षेपार्ह असल्याचा रिपोर्ट ट्विटरकडे केला. सवयीप्रमाणे आणि ट्विटरच्या पॉलिसीप्रमाणे त्याने हे अकाऊंट डिअॅक्टिव्हेट केलं. पण जेव्हा त्याला आपली चूक लक्षात आली होती तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Free Traffic Exchange

Videos similaires